Aditya Thackeray
Aditya Thackeray Team Lokshahi

आदित्य ठाकरेंनी घेतली तेजस्वी यादव यांची भेट

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेण्याचे ठरवले होते.

शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे आज एकदिवसीय बिहार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या भेटींचे फोटो समोर आले आहेत. या दोन्ही राजकीय वारसा असलेल्या आणि नव्या पिढीच्या नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झालीय. भाजपने या भेटीवरुन दोन्ही नेत्यांवर हल्लाबोल केलाय. राजकीय वर्तुळात या भेटीमुळे एकच चर्चा सुरु झाली आहे.

आदित्य ठाकरे यांनी या भेटीविषयी बोलताना सांगितले की, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेण्याचे ठरवले होते. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. प्रत्येक भेटीकडे तुम्ही राजकीय भेट म्हणून बघू नका. ही एक चांगल्या हेतूने घेतलेली भेट आहे. त्यांचे काम चांगले चालू असल्याने त्यांची भेट घेण्याचे ठरवले होते. असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले की, ये दोस्ती आगे चलती रहेगी असं म्हणत त्यांनी संविधान बचाव आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती. असे त्यांनी सांगितले.

तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी ते राबरी निवासस्थानी पोहोचले. यावेळी तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह सर्व नेत्यांचे स्वागत केले. स्वागत समारंभात तेजस्वी यादव यांनी मिथिला पेंटिंगची शीट आणि लालू यादव यांच्यावर लिहिलेली दोन पुस्तके आदित्य ठाकरे यांना भेट दिली. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी शिवाजी महाराज यांची अर्धाकृती मूर्ती देत तेजस्वी यादव यांचे स्वागत केलं. तसेच आदित्यसोबतचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले. यावेळेस आदित्य यांच्यासोबत शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चर्तुवेदी याही होत्या. सोबतच अनिल देसाई हे देखील उपस्थित होते.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com