aditya thackeray | eknath shinde
aditya thackeray | eknath shinde team lokshahi

कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, एवढी भीती कशाला?

विधिमंडळात आदित्य ठाकरे आक्रमक
Published by :
Shubham Tate

aditya thackeray : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी एकाही आमदाराने डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत केली नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. हे आमदार जेव्हा त्यांच्या मतदारसंघात जातील, तेव्हा काय करतील असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. बंडखोर आमदारांवर जो कोट्यवधींचा खर्च केला, तो कुठून आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच कसाबच्या वेळीही इतका बंदोबस्त नव्हता, एवढी भीती कशाला? कोणी पळणार आहे का? असा खोचक सवाल ही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (shivsena leader aditya thackeray slams bjp and cm eknath shinde rebel shivsena)

आमचा व्हीप पहिल्यांदा उपाध्यक्षांकडे दिला होता, त्यांनी तो मान्य केला आहे. आता याचा निर्णय कोर्टातच होईल. नैतिकतेच्या चाचणीत शिंदे बंडखोर नापास झाले असल्याची माहिती देखील त्यांनी त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनपर भाषणात चांगलीच टोलेबाजी रंगली. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्हीपचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या 16 आमदारांना आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो, पण आम्ही आज तसे बोलणार नाही असे सांगत व्हीपची चर्चा बाजूला ठेवूयात असे म्हणाले.

aditya thackeray | eknath shinde
Chhagan Bhujbal : ...म्हणून विश्वनाथन आनंदही शहांसोबत खेळण्यास नकार देतात

आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे काही खासदार फुटणार असल्याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे, मात्र हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी ह्या चर्चात तथ्य नसल्याचा दावा केलाय. रात्रीच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीला 16 खासदार उपस्थित होते अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली. नांदेडमध्ये बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघात आयोजित सेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हेमंत पाटील बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच असलेल्या खासदार हेमंत पाटील यांनी या मेळाव्याला हजेरी लावत बंडखोरांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी खासदार फुटीच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

aditya thackeray | eknath shinde
Ajit Pawar : शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असतं तर उद्धव ठाकरेंशी बोलून मुख्यमंत्री केलं असतं

'आम्ही कानात जे सांगितलं होतं ते भाजपने ऐकलं असतं तर आज जी परिस्थिती दिसत आहे ती अडीच वर्षांपूर्वीच झाली असती,' असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला 2019 च्या विधानसभा निवडणुकीत घडलेल्या घडामोडींची आठवण करून दिली. भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन न पाळल्यानेच आम्ही युती तोडली, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येतो. त्याचा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com