Aditya Thackeray
Aditya Thackeray Team Lokshahi

उद्या आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा

राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव ह्यांची भेट घेणार आहेत.

राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी घडत असताना, त्यातच आता काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे हे उद्या बिहार दौऱ्यावर जाणार आहे. बिहारमध्ये ते अनेक राजकीय मंडळींची भेट घेणार आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी हे नेतेही असणार आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या या बिहार दौऱ्याकडे आता सगळ्या राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत. त्याचबरोबर या भेटीतून नेमके काय साध्य केले जाणार असा सवालही आता राजकीय नेते आणि कार्यकर्ते विचारू लागले आहेत. या भेटीमध्ये ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची ते भेट घेऊन ते त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील या होणाऱ्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com