Bharat Gogawale | Uddhav Thackeray
Bharat Gogawale | Uddhav ThackerayTeam Lokshahi

उध्दव ठाकरे यांच्या सभेला गांभीर्याने घ्यायची गरज नाही, शिंदे गटाचे उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर

त्यांनी टिका केले त्याला कामातून उत्तर देऊ..., शिवसेना शिंदे गट मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले यांचे प्रत्युत्तर
Published by :
Sagar Pradhan

भारत गोरेगावकर |रायगड: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून जुंपलेली असताना त्यातच शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची शनिवारी महाडमध्ये सभा पार पडली. त्यावेळी उध्दव ठाकरेंनी नेहमी प्रमाणे शिंदे गटावर निशाणा साधला होता. उध्दव ठाकरेंच्या त्याच टीकेला आता शिंदे गटाचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Bharat Gogawale | Uddhav Thackeray
राजकारणातील सर्वात कमी बुद्धी असणारा सध्याचा काँगेस प्रदेशाध्यक्ष; शहाजी बापू पाटलांची पटोलेंवर जहरी टीका

काय दिले गोगावलेंनी प्रत्युत्तर?

माजी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शनिवारी महाड येथे घेतलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार व मुख्य प्रतोद भरत गोगावले यांना टिकेचे लक्ष केले होते. काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांना पक्ष प्रवेश देताना आगामी निवडणुकीत भरत गोगावले यांचे डिपॉझिट जप्त करा असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले होते. या सभेला उत्तर देताना आमदार भरत गोगावले यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन उध्दव ठाकरे यांच्या सभेला गांभीर्याने घ्यायची गरज वाटत नाही. त्यांना कामातून प्रत्युत्तर देऊ या सभेला महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित ठेवल्याने ती महाविकास आघाडीची सभा होती अशी टिका गोगावले यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com