Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

शरद पवारांच्या 'त्या' टीकेवर शिवसेना नेत्याचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, ते नास्तिक....

शेतकऱ्यांच्या अडचणींवर बारकाईने लक्ष दिलं जात आहे. सर्व कामे होत आहेत. विरोधक हे विरोध करायचा म्हणून बोलतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक खासदार, आमदारही आहेत. परंतु, दुसरीकडे या दौऱ्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी या दौऱ्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला साधला होता. या दोन्ही नेत्यांच्या टीकेनंतर आता शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Sharad Pawar
'श्रीरामाची पुजा केली, तर काय बिघडले?' विरोधकांच्या टीकेवर केसरकरांचा सवाल

नेमकं काय दिले शिवतारेंनी प्रत्युत्तर?

अयोध्या दौरा हा श्रद्धेचा विषय असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यांची श्रद्धा अयोध्येत आहे. आमची श्रद्धा शेतकऱ्यांवर आहे. अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यावर उत्तर देतांना शिवसेना नेते विजय शिवतारे म्हणाले की, 'शरद पवार हे नास्तिक आहेत. ते नास्तिक आहेत, हाच त्यांच्या बोलण्याचा हेतू आहे. ते आता कुठे पळापळ करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींवर बारकाईने लक्ष दिलं जात आहे. सर्व कामे होत आहेत. विरोधक हे विरोध करायचा म्हणून बोलतात.' अशी टीका त्यांनी यावेळी केली.

बेइमानी केल्यानंतर त्यांना आता राम आठवतो का? अशी टीका राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर केली होती. त्याबाबत शिवतारेंना विचारले असता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, 'खरं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्येत राम मंदिराचं काम सुरू आहे. त्या कामाची पाहणी करणे. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणे, यासाठी आम्ही अयोध्येत आलो आहोत. मी जेव्हा मुख्यमंत्री बनेल, तेव्हा मी अयोध्येला जाईल, असा शब्द त्यांनी आधीच दिला होता.' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com