गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा; म्हणाले, आमच्या तुकड्यांवर...

गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा; म्हणाले, आमच्या तुकड्यांवर...

दीड वर्ष जेलमध्ये राहिलेला हा एक हजार आठ महामंडलेश्वर साधू श्री संजय राऊत हा चोर जेलमध्ये कसा गेला.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यातच दुसरीकडे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची पाचोरा येथे सभा होत आहे. मात्र, या सभेआधी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ठाकरे गटामध्ये जोरदार जुंपलेली दिसून येत आहे. कोरोनाच्या नावाने जळगाव जिल्ह्यात तब्बल 400 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्याच आरोपावर आता गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे.

काय म्हणाले नेमकं गुलाबराव पाटील?

राऊताच्या आरोपावर बोलताना पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात संजय राऊत सर्वांशीच पंगा घेत आहे. संजय राऊत आम्हाला उंदीर म्हणतो पण संजय राऊत काय हेला आहे?, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी केला. त्यांनाही बोलता येतं. आम्हालाही बोलता येतं. परंतु त्यांनी चौकटीत राहून बोलावं.तीन वर्षात 81 कोटी रुपये खर्च केले. मग 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार मी कसा केला असा प्रश्न गुलाबराव पाटील यांनी विचारला.

पुढे ते म्हणाले की, बाँड लिहून देतो आरोप सिद्ध झाला तर मी मंत्री पदाचा राजीनामा देतो. आणि नाही सिद्ध झाला तर संजय राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. उलटा चोर कोतवाल को दाटे पुण्याचे आणि ठाण्याचे व्यवहार कसे केले हे मला माहीत आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या औकातीत राहावं. आमच्या तुकड्यांवर मोठा झालेल्यानी जास्त बोलू नये. आम्ही आव्हान फक्त संजय राऊत यांच्या बोलण्याला दिले आहे. संजय राऊत आमची डेड बॉडी काढत होते. कावळ्याच्या शापाने कधी गाई मरता का? दीड वर्ष जेलमध्ये राहिलेला हा एक हजार आठ महामंडलेश्वर साधू श्री संजय राऊत हा चोर जेलमध्ये कसा गेला. स्वतः जेलमध्ये गेले आणि आम्हाला चोर म्हणताय.अशी जोरदार टीका त्यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com