sanjay raut
sanjay rautteam lokshahi

सुनील राऊतांसह अनिल देसाईंना रोखले; भेटीला तुरुंग प्रशासनाची स्पष्ट मनाई

परवानगीशिवाय रक्तातील नातेवाईक सोडून इतर कोणीही आरोपीला भेटू शकत नाही
Published by :
Shubham Tate

sanjay raut : न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय राऊत यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिवसेना नेत्यांना तसेच त्यांचे भाऊ सुनील राऊतांनाही जेल प्रशासनाने भेटीची परवानगी नाकारली आहे. संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. कारागृह प्रशासनाने या नेत्यांना राऊतांना भेटण्यासाठी मनाई केली. आज सकाळी संजय राऊतांच्या भेटीला शिवसेनेचे १ खासदार आणि २ आमदार गेले होते. मात्र ऑर्थर रोड कारागृह प्रशासनानं त्यांना भेटीची परवानगी नाकारली. नियमानुसार कोर्टाच्या परवानगीशिवाय रक्तातील नातेवाईक सोडून इतर कोणीही आरोपीला भेटू शकत नाहीत, असं तुरुंग प्रशासनाकडून शिवसेनेच्या खासदार, आमदारांना सांगण्यात आलं. (shivsena mp sanjay raut in arthur road jail sunil raut and mp anil desai)

sanjay raut
Asia Cup 2022 : पांड्या धडाकेबाज खेळी करणार, साक्ष देणारी आकडेवारी

पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राऊत यांना औषधे आणि घरचे जेवण देण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. राऊत यांची ईडी कोठडी 8 ऑगस्टला समाप्त झाली होती. ईडीने सोमवारी राऊत यांना विशेष न्यायालयात उपस्थित केले होते. राऊत यांच्या अतिरिक्त कोठडीची आवश्यकता नसल्याचे ईडीतर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी राऊत यांची प्रकृती विचारात घेत त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com