Sanjay gaikwad | Girish Mahajan
Sanjay gaikwad | Girish Mahajan Team Lokshahi

भाजपमुळे नाही तर 'या' कारणामुळे शिवसेनेत बंडखोरी, गायकवाडांनी खोडले महाजनांचे वक्तव्य

आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही.

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात अद्यापही राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच ही बंडखोरी का झाली कशी झाले? याबाबत आजही वेगवेगळे विधान येत आहे. अशातच या बंडखोरीबाबत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी मोठे वक्तव्य केले होते. त्यावरच शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया देत हे विधान चुकीचे असलेले सांगितले आहे.

Sanjay gaikwad | Girish Mahajan
बच्चू कडूंना विनंती करणार आहे, का म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे असे?

नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?

गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, गिरीश महाजन यांनी केलेले हे विधान चुकीचे आहे. आम्ही भाजपमुळे शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. तर उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येत नव्हते. आमची कुठलीच कामं होत नव्हती. आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. असे संजय गायकवाड यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही, असा टोला देखील आमदार गायकवाड यांनी गिरीश महाजन यांना लगावला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com