फडणवीसांच्या 'त्या' आरोपांनंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कॉन्ट्रॅक्टप्रमाणे...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार जुंपलेली असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला नाही. सोबतच त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर देखील गंभीर आरोप केले आहेत. काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली असताना त्यावरच आता शिवसेना (ठाकरे गट) यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे हे म्हणाले की, भाजपाने ईडी, सीबीआय या संस्थेचा वापर करून मुद्दाम महाविकासआघाडीच्या नेत्यांना सातत्याने लक्ष्य केले. संजय राऊत, अनिल देशमुख यांची उदाहरणं समोर आहेत. हसन मुश्रीफ, अनिल परब यांनाही तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे भाजपाने दिलेल्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे आहे. त्यामुळे अशाप्रकारचे षडयंत्र करण्याचं काम भाजपाचं आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांनी असा आरोप करणं चुकीचं आहे. खरं तर असं षडयंत्र करणं भाजपाची परंपरा बनलं आहे. असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो. परंतु, मला मातोश्रीचे दरवाजे बंद होते. एवढेच नाहीतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावर केसेस टाकून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे व काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं. मी काहीही केलं नव्हतं त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत. मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
तसेच, माझ्याकडून त्यांच्याप्रती कुठलीही कटुता नाही. एका कार्यक्रमात मला रश्मीवहिनी भेटल्या असता उद्धवजींना माझा नमस्कार सांगा, असे मी सांगितले. कारण महाराष्ट्राची संस्कृती वैर जपणारी नाही, असेही फडणवीस म्हणाले आहेत.