Ambadas Danve
Ambadas DanveTeam Lokshahi

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर दानवेंची टीका; म्हणाले, अजेंडा...

आमच्याकडून जे फुटून गेलेय ते त्यांचा कोणताच अजेंडा नाहीय ते फक्त सत्ता उपभोगण्यासाठी गेले आहेत.

महाराष्ट्रात झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधानांचा हस्ते वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात विविध विकास कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. दरम्यान याच दौऱ्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

Ambadas Danve
सत्यजित तांबेंबद्दल पटोंलेंनी दिली महत्त्वाची माहिती; म्हणाले, कॉंग्रेसमधून...

काय म्हणाले अंबादास दानवे?

भारतीय जनता पार्टी स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी मुंबईत असू राज्यात असू किंवा देशात असो यासाठीच काम करते. आणि जे आमच्याकडून जे फुटून गेलेय ते त्यांचा कोणताच अजेंडा नाहीय ते फक्त सत्ता उपभोगण्यासाठी गेले आहेत. आता जनता यांना नाकारते म्हणून ते बाळासाहेबांच्या नावाचा सहारा घ्यावा लागतो. अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com