Sushma Andhare | Navneet Rana
Sushma Andhare | Navneet RanaTeam Lokshahi

सुषमा अंधारेंचा नवनीत राणांवर निशाणा; म्हणाल्या, नवनीत आक्कानं...

तसाच भगव्या रंगाचा कास्ट्यूम घालून एक गाण नवनीत आक्कानं पण केलं. पण, नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असताना त्यातच शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्या आज बीड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे.

Sushma Andhare | Navneet Rana
'शिवसेना फुटीचा देखावा.. पक्षफुटी आभासी' राऊतांची प्रतिक्रिया

बीड येथील कार्यक्रमात बोलत असताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, कास्ट्यूम घालून एक गाण आमच्या नवनीत अक्कानी केले आहे. पण, त्यांच्यावर चर्चा झाली नाही. मग, ज्या गाण्यात खान असते म्हणून चर्चा होते का. खान असतो म्हणून त्यावर आक्षेप होतात. तसाच भगव्या रंगाचा कास्ट्यूम घालून एक गाण नवनीत आक्कानं पण केलं. पण, नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही. अस का?, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

नवनीत अक्काच्या नावाच्या पुढे खान, शेख, तांबोळी, असं काही नाही म्हणून का. माफ करा, मी जरा जास्तचं स्पष्ट आहे. मी पोलिटीकली करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेक्ट असलं पाहिजे. सोशली करेक्ट असणं मला फार महत्त्वाचं आहे. मी माझं म्हणणं ठामपणे मांडते, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com