Shivsena Teaser
Shivsena TeaserTeam Lokshahi

Shivsena Teaser: बंडखोरीनंतरचा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन; शिवसेनेकडून टीझर प्रदर्शित

19 जूनला गोरेगाव येथे पार पडणार शिवसेनेचा वर्धापन दिन.
Published by :
Sagar Pradhan

मुंबई: साधारण एक वर्षापूर्वी शिवसेनेत सर्वात मोठी बंडखोरी झाली. राज्यातील सर्वात मोठा पक्ष यावेळी अस्थिर झाला. या बंडखोरीमुळे शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा करण्यात आला. अखेर अनेक महिन्यांनंतर निवडणूक आयोगाने निर्णय देत शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह देण्यात आलं. या अभूतपूर्व बंडखोरीनंतर शिवसेनेचा पहिलाच वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. याच वर्धापन दिनाचा टीझर शिवसेनेने प्रदर्शित केला आहे.

Shivsena Teaser
शिंदेंच्या जाहिरातीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ...त्याबद्दल त्यांचे धन्यवाद

असा आहे शिवसेनेचा टीझर

'शिवसेना' नावाची निडर हिंदुत्वाची डरकाळी सबंध हिंदुस्थानात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या मुखातून दुमदुमली, त्याला 57 वर्ष पूर्ण होतील. त्यांच्या तत्वांशी प्रामाणिक असलेले त्यांचे वाघ, अर्थात कट्टर 'शिवसैनिक' गोरेगावला वर्धापन दिन साजरा करणार आहेत. त्या दिवशी धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांचा जागर होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com