बेसुमार लुटमार करून माती खाल्ली 
अन् मती...; आदित्य ठाकरेंवर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

बेसुमार लुटमार करून माती खाल्ली अन् मती...; आदित्य ठाकरेंवर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल

श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेतली. घटनाबाह्य सरकार आल्यानंतर जानेवारी महिन्यांपासून मुंबईतील रस्त्यांच्या कामाचे विविध घोटाळे उघडकीस आणले आहेत. त्याची माहिती राज्यपालांना दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावरुन डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कवितेतून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बेसुमार लुटमार करून माती खाल्ली, अन् मती आता गुंग झाली, अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली आहे.

बेसुमार लुटमार करून माती खाल्ली 
अन् मती...; आदित्य ठाकरेंवर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल
Maharashtra Political Crisis : काही जण गणपती पाण्यामध्ये ठेवून प्रार्थना करू लागले; सत्तारांचा ठाकरे गटावर निशाणा

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

मुख्यमंत्री म्हणजे सीएम म्हणजे करप्ट मॅन. कधी शेतात पळून जातात तर कधी गुवाहाटी कुठे निघून जातात. कॉन्ट्रॅक्टर ना ६६ टक्के फायदा पोहोचवला जातो आहे, असे आरोप आदित्य ठाकरे यांनी केले आहेत. या भ्रष्टाचाराची लोकायुक्त मार्फत चौकशी व्हावी. मुंबई महापालिका आयुक्तांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

यावरुन श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. भ्रष्टाचाराचे बाळकडू प्यायले, रस्त्यावरचे डांबर गिळले. कचऱ्याचे डोंगर फस्त केले, मिठीच्या गाळाचे पेले रिचवले. डिजीटल शिक्षणातून दही मटकावले, कोविड मृतांच्या टाळूवरचे लोणीही नाही सोडले. तरीही युवराज, किती ही पोटदुखी? भ्रष्टाचार करुनी उभा जन्म गेला तरी भूक नाही संपली. बेसुमार लुटमार करून माती खाल्ली, अन् मती आता गुंग झाली, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

दरम्यान, संजय शिरसाट यांनीही आदित्य ठाकरेंवर राज्यपाल भेटीवरुन टीकेची तोफ डागली होती. कोणताही टेंडर असू किंवा भरती असू हे मातोश्रीच्या परवानगी शिवाय होत नव्हती. मग मागील 25 वर्ष मुंबईमध्ये खड्डे का? हा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना घेणे-देणे नाही. मात्र, ठेकेदारावर बोलायचे ही आदित्य यांची रणनीती आहे. राज्याचे वाटोळे झाले तरी चालेल पण मुंबई परत द्या ही त्यांची भूमिका आहे. त्यांनी मुंबईला ओरबडून खाल्ले आहे, असे संजय शिरसाट म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com