KDMC
KDMCTeam Lokshahi

हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे बोलालयला देखील हे घाबरत होते, खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

आघाडीमध्ये हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे बोलायला घाबरायचे. हिंदू ह्रदय सम्राट हे वंदनीय झाले

अमजद खान।कल्याण: स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे घोषवाक्य होते की, गर्व से कहो हम हिंदू है. या वाक्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षात काही कारभार झाला का? जी आघाडी केली. त्या आघाडीमध्ये हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे बोलायला घाबरायचे. हिंदू ह्रदय सम्राट हे वंदनीय झाले अशा परिस्थितीत शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला, तो चुकीचा होता का? असा सवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितीत करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

KDMC
आव्हान स्वीकारा, मग कळेल दिवा कोण आणि सूर्य कोण? अंबादास दानवेंचे बावनकुळेंना प्रत्युत्तर

डोंबिवलीतील पाटीदार भवन सभागृहात शिंदे गटाच्या वतीने हिंदू गर्वगजर्ना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपरोक्त टोला लगावला. याप्रसंगी बंदरे आणि खणीकर्म खात्याचे मंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, राजेस मोरे, दीपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

KDMC
न्यायदेवतेने विश्वास सार्थ ठरवला, पहिल्या न्यायालयीन विजयानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की,न्यायालयाने शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरील ठिकाण नाकारले आहे. न्यायालयाचा निकाल एका अर्थाने योग्यच लागला असे मला वाटते. कारण नवी मुंबईपाठोपाठ डोंबिवलीतील हिंदू गर्व गजर्ना मेळाव्यातील कार्यकत्र्याची अलोट गर्दी पाहता शिवाजी पार्क पुरले नसते. ही गर्दी दसरा मेळाळ्य़ाचा ट्रेलर आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क पेक्षा मोठे मैदान घ्यावे लागेल. मुंबईत मैदान उपलब्ध न झाल्यास दसरा मेळावा ठाणो किंवा नाशिकमध्ये घ्यावा अशी सूचना बंदरे आणि खणीकर्म मंत्री दादा भुसे यांनी येथे केले.

Lokshahi
www.lokshahi.com