Shrikant Shinde | Shiv Sena
Shrikant Shinde | Shiv Senateam lokshahi

ठाण्यात श्रीकांत शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन

पोस्ट फाडणाऱ्यांना नरेश म्हस्केंचा इशारा
Published by :
Shubham Tate

Shrikant Shinde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने ठाकरे सरकार विरोधात आता कंबर कसली असून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आपल्या गटाचे नाव ठरवल्यानंतर आता विधानसभेत प्रोटेम स्पीकर नियुक्त होण्याची शक्यता आहे. यानंतरच फ्लोर टेस्ट करण्याची मागणी केली जाऊ शकते. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे उल्हासनगरमध्ये श्रीकांत शिंदेच्या (Shrikant Shinde) ऑफिसवर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. तसेच मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या कार्यालयाचा बंदोबस्त देखील वाढवला आहे. (Shrikant Shinde's strong show of strength in Thane)

Shrikant Shinde | Shiv Sena
मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह सर्व जिल्ह्यांमध्ये 800 पदांसाठी भरती

शिवसेनेचा भगवा अजूनही डौलाने फडकतो आहे. शिंदे साहेब आजही सांगत आहेत मी शिवसेनेतच आहे. शिंदे साहेबांनी जे केलं ते कसं बरोबर आहे ते दाखवण्यासाठी लोकांनी त्यांना समर्थन दिलं आहे. शिंदे साहेबांसोबत चाळीस शिवसेनेचे आमदार आणि दहा अपक्ष आमदार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांनी विश्वास दाखवला याला काहितरी कारण आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. ठाण्यात श्रीकांत शिंदेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत कार्यकत्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. तसेच पोस्टर फाडणाऱ्यांना नरेश म्हस्केंनी यावेळी इशारा दिला आहे.

Shrikant Shinde | Shiv Sena
नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य; भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही

आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. आम्ही शिवसेनेसोबत आहोत. हिंदुत्वाचा विचार त्यांनी हाती घेतला आहे. प्रत्येक ठिकाणी हे आघाडीतील पक्ष हे शिवसैनिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी आघाडी तोडा आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. शेवटपर्यंत राहणार आहे. पोस्टरला काळं फासण्याचा प्रकार झाला मात्र त्यांना मला सांगायचं आहे आमच्या नादी लागू नका. अशा शब्दात नरेश म्हस्केंनी शिवसेना कार्यकत्यांना इशारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com