प्रसिध्द कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

प्रसिध्द कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

42 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रूग्णालयात सुरु होते उपचार

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले आहे. 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मागील 42 दिवसांपासून दिल्लीतील एम्स रूग्णालयात उपचार घेत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

राजू श्रीवास्तव यांना व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती ढासळत होती. काहीच दिवसांपुर्वी डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले होते. आज अखेर उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

राजू श्रीवास्तव हे इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते. राजू श्रीवास्तव हे अतिशय मस्त आणि निडर विनोदी कलाकार होते. त्यांनी अनेक चित्रपट आणि शोमध्ये काम केले. ते रिअ‍ॅलिटी शोमध्येही सहभागी झाले होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कॉमेडी शोमधून राजू यांना विशेष ओळख मिळाली होती. या शोच्या यशानंतर राजूने मागे वळून पाहिलेच नाही. राजू श्रीवास्तव एक अभिनेता, विनोदी अभिनेता तसेच एक नेता होता. आपल्या काळात त्यांनी आपल्या खास शैलीत राजकारणी आणि चित्रपट कलाकारांवर ताशेरे ओढले. इतकंच नाही तर गंभीर विषयांवर राजू हे अनेकवेळा विनोदातून टोमणा मारायचे. त्यांच्या विनोदांमुळे मोठ्या राजकारण्यांची झोप उडत असे. यामुळे त्यांना अनेक वेळा धमकीच्या कॉलला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, कोणत्याही गॉडफादरशिवाय राजूने इतके यश मिळवले हे पाहणे प्रेरणादायी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com