आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक

आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक

मराठा आरक्षणाचे आंदोलन तापले आहे.

मराठा आरक्षणाचे आंदोलन तापले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असून नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांना अनेक ठिकाणाहून पाठिंबा मिळताना दिसत आहे.

यातच आता बीडच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. आरक्षणाच्या मुद्दावरुन दगडफेक करण्यात आली आहे. आंदोलन गेट तोडून घरात घुसले. सोळंकेंच्या माजलगावच्या घरावर ही दगडफेक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com