मला शिंदे आणि दादांसोबतचा भाजप आवडत नाही; मुनगंटीवारांच्या विधानाने चर्चांना उधाण

सुधीर मुनगंटीवार यांना भाजपनं शिंदे आणि अजित पवारांशी केलेली युती आवडत नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भाजप मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबतचा भाजप आवडत नाही. मला देशाची सेवा करणारा भाजप आवडतो, असे विधान करुन एकच खळबळ उडवून दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर, मुनगंटीवार यांना भाजपनं शिंदे आणि अजित पवारांशी केलेली युती आवडत नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. मुनगंटीवार युतीबाबत बोलून गेल्यानंतर आपण काय बोललो याची त्यांना जाणीव झाली यानंतर त्यांनी स्वतः सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com