9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले; सुप्रिया सुळेंचा लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल

9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले; सुप्रिया सुळेंचा लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल

मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली

नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरू झाली आहे. या प्रस्तावावर संसदेत तीन दिवस १८ तास चर्चा होणार आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले, असा निशाणा सुळेंनी मोदी सरकारवर साधला आहे.

9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले; सुप्रिया सुळेंचा लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल
कीर्तनकार इंदुरीकरांच्या अडचणीत वाढ! 'त्या'प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

जेव्हा मी सरकारबद्दल विचार करतो तेव्हा माझ्या मनात जे येईल. ते म्हणजे व्यर्थ. सरकारकडून उद्धटपणा नेहमीच दिसून येतो. हे भाजपवाले नेहमी बोलतात, नवरत्न वर्ष. पण, या ९ वर्षांत भाजपने काय केले? फक्त राज्य सरकारे पाडली गेली. महागाई वाढली. जुमला देण्यात आला. जुमला त्यांच्या गळ्यातील हाड झाला आहे, असे गडकरीच म्हणाले.

तसे भाजप सरकार मोठमोठे दावे करते. मात्र गेल्या 9 वर्षात भाजपने केवळ 9 राज्यांमध्ये सरकार स्थापन केले आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हंटले आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाचाही सरकारला विसर पडल्याचा आरोप त्यांनी केला.

तर, मणिपूर घटनेवर बोलताना सुप्रिया सुळे लोकसभेत मोदी सरकारविरोधात आक्रमक झाल्या. त्या म्हणाल्या की, मणिपूरमध्ये महिलांची धिंड काढण्यात आली, मग कसे सहन करायचे? मोदी सरकारला काहीच वाटत नाही का? त्या भारताच्या मुली नाहीत का? अशा प्रश्नांची तोफही सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर डागली आहे.

मी वंदे भारतच्या विरोधात नाही. मात्र, वंदे भारत ही ट्रेन गरिबांसाठी नाही. माझ्या मतदारसंघात एकाही स्थानकावर वंदे भारतचा थांबा नाही. वंदे भारत केवळ पाहता येते, प्रवास करणं अशक्य असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com