जुन्या वास्तूतील प्रवास आज थांबला आणि उद्यापासून...; सुप्रिया सुळेंचे ट्विट

जुन्या वास्तूतील प्रवास आज थांबला आणि उद्यापासून...; सुप्रिया सुळेंचे ट्विट

सुप्रिया सुळेंनी ट्विटरवरुन भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी बारामती जनतेचे आभार मानले.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारला थेट संसदेत आव्हान दिले आहे. यानंतर त्यांनी ट्विटरवरुन भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी सुप्रिया सुळेंनी बारामती जनतेचे आभार मानले.

जुन्या वास्तूतील प्रवास आज थांबला आणि उद्यापासून...; सुप्रिया सुळेंचे ट्विट
गोपीचंद पडळकरांविरोधात अजित पवार गट आक्रमक; चोप देण्याचा इशारा

काय आहे सुप्रिया सुळे यांचे ट्विट?

बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी म्हणून २००९ साली सर्वप्रथम लोकसभेत आपण सर्वांनी मला निवडून दिले. तेव्हापासून २०१४ आणि २०१९ असे सलग तीनवेळा आपण मला आपली प्रतिनिधी म्हणून निवडून लोकसभेत पाठविले. आजपर्यंत आपल्या सर्वांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करीत महाराष्ट्रातील जनतेचा, समाजातील शेवटच्या माणसापासून प्रत्येक घटकाचा आवाज लोकशाहीच्या मंदिरात पोहचविण्याचा प्रांजळ प्रयत्न करत आहे. आपण मला ही संधी उपलब्ध करून दिली याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार, असे सुप्रिया सुळेंनी म्हंटले आहे.

संसदेच्या या जुन्या वास्तूत अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचाही सहवास लाभला. खूप काही शिकताही आलं. अनेक ऐतिहासिक प्रसंगांचे साक्षीदार होता आले. संसदेच्या या जुन्या वास्तूतील प्रवास आज थांबला आणि उद्यापासून ती नव्या वास्तूत स्थलांतरित होत आहे. जुन्या वास्तूचा निरोप घेऊन नव्या वास्तूत प्रवेश करीत असताना एकाच वेळी आनंद आणि हुरहूर अशा दोन्ही भावना दाटून आल्या आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, संसदेचे विशेष अधिवेशन उद्यापासून नवीन संसद भवनात होणार आहे. तत्पुर्वी, जुन्या संसदेत आठवणींना उजाळा देण्यात आला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जवाहरलाल नेहरूंपासून ते लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग आणि अटलबिहारी वाजपेयींपर्यंतच्या सरकारांच्या कामगिरीचा उल्लेख केला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com