sushma andhare
sushma andhareTeam Lokshahi

शिंदे गटाचे 20 आमदार फोडून फडणवीस लवकरच मुख्यमंत्री बनतील; सुषमा अंधारेंचा मोठा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूखंड घोटाळ्यावरून विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशनात वातावरण चांगलेच तापवले आहे

पंढरपूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली व मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. परंतु, मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ही इच्छा बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केला आहे.

sushma andhare
फडणवीस, राणेंच्या दाव्याला सीबीआयचा दुजोरा; म्हणाले, दिशा सालियन प्रकरण...

सुषमा अंधारे म्हणाल्या की, 83 कोटीच्या भूखंडावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. शिंदे गटाचे 40 आमदारांपैकी 20 आमदार फोडून फडणवीस लवकरच मुख्यमंत्री बनतील, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावध राहण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला. तसेच, भविष्यात नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाला देखील फडणवीस आव्हान देऊ शकतात, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.

sushma andhare
बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? SIT चौकशी करा; राऊतांची मागणी

काय आहे प्रकरण?

नागपूरमधील झोपडपट्टीधारकांच्या आवास योजनेसाठी भूखंड ताब्यात घेण्यात आले होते. जे १६ जणांना भाडेतत्त्वावर दिले असल्याचे निदर्शनास आले. हे भूखंड तत्कालीन नगरविकास मंत्री यांच्या आदेशानुसार वाटप केल्याचे याचिकेत म्हटले आहे. हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी घेतलेल्या निर्णयाला न्याय प्रशासनातील हस्तक्षेप असल्याचे म्हणत न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले. यावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एकनाथ शिंदे यांची राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com