Sushma Andhare : 'त्या' फोटोंमध्ये गिरीश महाजनसुद्धा, मी ते फोटो लवकरच ट्विट करेन

Sushma Andhare : 'त्या' फोटोंमध्ये गिरीश महाजनसुद्धा, मी ते फोटो लवकरच ट्विट करेन

मी ते फोटो लवकरच ट्विट करेन
Published by :
Siddhi Naringrekar

विधानसभेत बोलताना नितेश राणे यांनी एक फोटो दाखवत सुधाकर बडगुजर १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत काय करत होते? असा सवाल विचारत फडणवीसांकडे चौकशीची मागणी केली आहे. सलिम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. नितेश राणे म्हणाले की, १९९३ चा बॉम्बब्लास्ट हा देशाला हादरवणारा होता. यातील आरोपी सलिम कुत्ता हा पेरोलवरती असताना तो पार्टी करतो. उद्धव ठाकरे गटाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सोबत पार्टी करतो. हे गंभीर आहे. याला पाठींबा कोणाचा आहे? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला.

सलीम कुत्ता पेरोलवर असताना पार्टी कसा करु शकतो. दाऊदच्या सहकाऱ्यासोबत पार्टी करण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यात आणखी कोणाचा संबंध आहे का याची चौकशी केली जाईल. या सलीमचा त्या व्यक्तीशी संबंध काय? एसआयटीच्या माध्यमातून वेळेत चौकशी केली जाईल. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, नितेश राणे यांना कदाचित कल्पना नाही आहे की, तो फोटो दाखवला गेलाय त्या फोटोसोबत इतर अजून चार फोटो आहेत. त्या चार फोटोंमध्ये गिरीश महाजनसुद्धा आहेत. आणि एका लग्नाच्या कार्यक्रमातला फोटो आहे. त्या फोटोमध्ये भाजपाचे जवळपास 3 ते 4 जण आहेत. मी ते फोटो लवकरच ट्विट करुन आपल्यापर्यंत पोहचवायची व्यवस्था करते. बडगुजर हे परवा माझ्यासोबत पत्रकार परिषदमध्ये होते. नितेश राणेंनी अभ्यास करुन बोलावे. ते दरवेळेला असे तोंडघशी पडतात. याचे मला वाईट वाटते. असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Sushma Andhare : 'त्या' फोटोंमध्ये गिरीश महाजनसुद्धा, मी ते फोटो लवकरच ट्विट करेन
दाऊदच्या राईट हॅण्डसोबत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची पार्टी? फडणवीसांची मोठी घोषणा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com