Sushma Andhare
Sushma AndhareTeam Lokshahi

शरद पवारांसमोरच मंचावर रडू लागल्या सुषमा अंधारे; म्हणाल्या, तर कान पकडा...

माझ काही चुकत असेल तर कान पकडा. मी लाखवेळा माफी मागायला तयार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या. दरम्यान या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत असताना सुषमा अंधारे शरद पवारांसमोर रडल्या. मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची शरद पवार यांच्याकडे तक्रार केली. संबंधित तक्रार करत असताना सुषमा अंधारे यांना रडू कोसळलं.

Sushma Andhare
सामना अग्रलेखातील टीकेचा पवारांनी घेतला समाचार; म्हणाले, आम्ही महत्त्व देत नाही...

नेमकं काय घडलं?

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सुषमा अंधारे म्हणाले की, 'सर इथे राजकारणाचा विषय नाही. पण आवर्जून सांगणे गरजेचे आहे. अश्लाघ्य पद्धतीने जेव्हा आमदार माझ्यावर टीका करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही, मला अपेक्षित होतं सर, सभागृहात आपण सगळे विरोधी पक्ष म्हणून बाकावर बसतो. तक्रार का लिहून घेतली नाही? खरे की खोटं? पब्लिक डोमेनमध्ये सगळा कंटेंट आहे. तरी सुद्धा सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता' हे बोलताच त्या रडायला लागल्या. माझ काही चुकत असेल तर कान पकडा. मी लाखवेळा माफी मागायला तयार आहे. कारण मी आपल्याकडे हक्काने बोललेच पाहिजे, अस त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, सर, लोकं आपल्याला आधारवड वगैरे म्हणतात. आपण राजीनामा दिला तेव्हा त्यादिवशी आपल्यासाठी पत्र लिहिलं होतं ते वाचून दाखवणार आहे. त्यादिवशी राऊत साहेबांनी प्रिंट काढून दिली, असं मला माहिती मिळाली. पण हे पत्र मला पुन्हा एकदा आपल्यासमोर सांगितलं पाहिजे. मला आपला राजीनामा नको होता म्हणून मी पत्र लिहिलं होतं. असे त्यांनी सांगितले आणि पुढे निवृत्तीच्या घोषणेनंतर त्यांनी पवारांसाठी लिहलेले पत्र पुन्हा वाचुन दाखवले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com