संजय शिरसाटांची लेकीबाळींकडे बघण्याची दृष्टी गलिच्छ आणि विकृत; सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर

संजय शिरसाटांची लेकीबाळींकडे बघण्याची दृष्टी गलिच्छ आणि विकृत; सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर

संजय शिरसाटांच्या विधानावर सुषमा अंधारेंचा पलटवार

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेतून शिंदे गटावर हल्लाबोल करत असतात. यादरम्यान सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील आमदारांचा भाऊ म्हणून उल्लेख करतात. परंतु, याचवरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंवर टीका करताना जीभ घसरली. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. पण, तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत, असे विधान त्यांनी केले होते. यावर सुषमा अंधारेंनी पलटवार केला आहे.

संजय शिरसाटांची लेकीबाळींकडे बघण्याची दृष्टी गलिच्छ आणि विकृत; सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर
'संजय राऊतांनी बोलावं आणि त्याची रीघ उध्दव ठाकरेंनी ओढावी'

सुषमा अंधारे म्हणाल्या की, संजय शिरसाटांनी माझ्याबद्दल काहीतरी सवंग सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचे माध्यमांकडून समजले. इतरांच्या लेकीबाळीकडे आई किंवा बहिणीच्या नात्याने बघण्यासाठी अंगी शील व पारमिता असावी लागते. सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाट सारख्या लोकांकडे अशी शील व पारमिता असण्याची सुतराम शक्यता नाही. अन् ज्याच्या ठायी शील व परमिता नाही ती व्यक्ती बाबासाहेबांचा अनुयायी तरी असू शकते का असा प्रश्न उरतोच?

उलटपक्षी शिरसाटांच्या बोलण्यातून महाराष्ट्रातील लेकीबाळीकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे याचाच त्यांनी पुरावा दिला. म्हणूनच मला शिरसाट यांच्या बोलण्याचा राग आला नाही. उलट स्वतः ची वैचारिक लायकी दाखवून दिल्या बद्दल त्यांचे अभिनंदन, अशी टीका त्यांनी संजय शिरसाटांवर केली आहे. तसेच, पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा, असा टोलाही अंधारेंनी लगावला आहे.

काय म्हणाले होते संजय शिरसाट?

आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. मात्र तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहित. अरे पण तू आहे तरी कोण? असे संजय शिरसाट यांनी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com