Maratha Reservation : आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसाठी तानाजी सावंतांची मोठी घोषणा; 5 लाखांची मदत करणार

Maratha Reservation : आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसाठी तानाजी सावंतांची मोठी घोषणा; 5 लाखांची मदत करणार

मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात तापला आहे. अशातच, तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात तापला आहे. अशातच, तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाची मदत करणार असल्याची घोषणा तानाजी सावंत यांनी केली आहे. तसेच, आत्महत्याग्स्त कुटुंबातील मुलांचे पालकत्व देखील तानाजी सावंत घेणार आहेत.

Maratha Reservation : आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसाठी तानाजी सावंतांची मोठी घोषणा; 5 लाखांची मदत करणार
Air India : तब्बल इतक्या हजार कोटी रुपयांचा सौदा! पाहा कोण घेणार एअर इंडियाची इमारत

तानाजी सावंत म्हणाले की, मराठा आरक्षण लढ्यात ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणार आहोत. हात जोडून विनंती करतोय की कुणीही टोकाची भूमिका घेवू नका. आज कोणतीही भूमिका मांडत नाही. समाजाचे देणं लागतो म्हणून मदत करतोय. दिवाळीचा सण आहे कर्तव्य म्हणून छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ५ लाख प्रत्येक कुटूंबीयांना मदत करणार आहेत. यात ३५ कुटुंबियांना मदत करणार आहे. दत्तक पालकत्व स्विकारतोय. मुलांना नोकरी आणि मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पाहिलं आरक्षण रद्द झाल्यानंतर वर्ष दोन वर्षे कोणीच काही बोललं नाही आणि अचानक एक वादळ यावं असं चाललेलं आहे. आरक्षण कधी मिळेल हे सांगायला मी काही पंचांग घेऊन बसलो नाही हा लढा आहे. काही बाबी कायदेशीर आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

आज एका पद्धतीने शासनाची दमछाक करून आताच्या आताच आरक्षण द्या, कागदावर लिहून द्या अशी भूमिका घेतली जात आहे. पण आरक्षण टिकलं पाहिजे ते महत्वाचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं. तत्कालीन सरकारला सुप्रीम कोर्टात का टिकवता आलं नाही हा प्रश्न आहे, असा निशाणा सावंत यांनी महाविकास आघाडीवर साधला आहे.

दरम्यान, भुजबळ त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. त्यामुळे ते लढत आहेत. ज्याच्या त्याच्या चौकटीत ज्याला त्याला त्याच्या जे हक्काचं आहे ते त्याला मिळालं पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com