tejas thackeray
tejas thackeray team lokshahi

उद्धव ठाकरेंकडे हाच शेवटचा पर्याय? 'तेजस' अस्त्र?

शिवसेनेसाठी ती दो से भले तीन ठाकरे
Published by :
Team Lokshahi

tejas thackeray : एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि 12 खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. तर, शिवसेनेतील गळती थांबता थांबत नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाचवण्याचा मोठा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे. यासाठीच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले असून, पक्षातील गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (tejas thackeray will enter shiv sena)

tejas thackeray
शिंदे सरकारने एका महिन्यात घेतले 751 निर्णय

सध्या बंडामुळं शिवसेनेत उभी फूट पडलीय. शिवसेनेतली मातब्बर मंडळी पक्ष सोडून चाललेत. अशावेळी तेजस मैदानात उतरून शिवसेनेत आणि शिवसैनिकांमध्ये नवी उमेद निर्माण करू शकतात. तसं झाल्यास शिवसेनेसाठी ती दो से भले तीन ठाकरे अशी जमेची बाजू ठरणार आहे.

tejas thackeray
पाकिस्तानमध्ये पुराचा कहर, 500 हून अधिक लोकांचा मृत्यू

दरम्यान, शिवसेनेच्या पुर्नबांधणीची जबाबदारी आदित्य ठाकरे यांनी आपल्या शिरावर घेतली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. तसेच बंडखोरांवर कठोर टीका करून ते पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीदेखील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असल्याचे सांगितलेले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com