अजित पवारांचा पुतळा जाळणारे चंद्रकांत खैरे, दानवेंसह दहा जण निर्दोष

अजित पवारांचा पुतळा जाळणारे चंद्रकांत खैरे, दानवेंसह दहा जण निर्दोष

राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळण्याचा 2011 मध्ये केला होता प्रयत्न

औरंगाबाद : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा पुतळा जाळणारे शिनसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यासह दहा जणांना निर्दोष मुक्तता केली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वाय. पी. पुजारी यांनी 2011 प्रकरणी हे आदेश दिले आहेत.

अजित पवारांचा पुतळा जाळणारे चंद्रकांत खैरे, दानवेंसह दहा जण निर्दोष
शिवसेनेच्या माजी आमदारावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

2011 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण होते. अजित पवारांचा निषेध करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत होती. अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात टीव्ही सेंटर चौकातही निदर्शने आली होती. यावेळी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासह दहा जणांनी अजित पवार यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

अजित पवारांचा पुतळा जाळणारे चंद्रकांत खैरे, दानवेंसह दहा जण निर्दोष
Mahrashtra Rain Upadte: सीएसएमटी ते वडाळा वाहतूक दोन तास बंद

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. तसेच तपासातील त्रुटी आणि साक्ष पुरव्यांमधील विसंगतीमुळे अखेर आज चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासह दहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com