भाजपविरोधात ठाकरे गटाने थोपटले दंड; कर्नाटक निवडणूक लढवणार?

भाजपविरोधात ठाकरे गटाने थोपटले दंड; कर्नाटक निवडणूक लढवणार?

र्नाटकात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.

मुंबई : कर्नाटकात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वपक्षीयांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. भाजप-कॉंग्रेस अशी लढत रंगलेली असतानाच आता ठाकरे गटानेही भाजप विरोधात आता दंड थोपटले आहेत. कर्नाटक निवडणुकीत ठाकरे गट लढवणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे कर्नाटक निवडणुकीकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. यासंबंधाची माहितीही ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी दिली आहे.

भाजपविरोधात ठाकरे गटाने थोपटले दंड; कर्नाटक निवडणूक लढवणार?
Ajit Pawar on Sanjay Raut : ईडीच्या तपासाबाबत राऊत साहेबच बोलू शकतील

निवडणूक एकत्रितपणे लढणार आहोत. सर्व मिळून सहा जागा लढवणार आहे. एकीकरण समितीच्या आड कोणीही जाऊ नये. संघर्ष जिवंत कोणी ठेवला? लढाया लढवल्या पाहिजे. उद्धव ठाकरे या संदर्भात निर्णय घेतील, असे अरविंद सावंत यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आता एकूण 5,102 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये 3,327 पुरूष उमेदवारांनी 4170 अर्ज तर महिला 304 महिला उमेदवारांनी 391 अर्ज दाखल केले आहेत. भाजपाकडून 707, काँग्रेसकडून 651, जेडीएसकडून 455 आणि इतर पक्षांकडूनही अर्ज दाखल करण्यात आले. एक उमेदवार जास्तीत जास्त चार अर्ज दाखल करू शकतो. 21 एप्रिल रोजी या अर्जांची छाननी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com