Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

'निवडणुक आयुक्तांचे वडील वर बसले असतील पण माझे नाही' निवडणूक आयुक्तांवर उद्धव ठाकरेंची टीका

मी मागे बोलो रावण उताणा पडला धनुष्य घेऊन तर हे मिंधे कुठे पेलू शकणार.
Published by :
Sagar Pradhan

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूनमधील खेड येथे शिवगर्जना यात्रेनिमित्त आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह दिल्यानंतर पहिल्यांदाच सभा झाली. त्यामुळे सर्वांचेच लक्ष उध्दव ठाकरे यांच्या या सभेवर होते. यावेळी यासभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र डागले. शिवसेनेची स्थापना निवडणुक आयोगाचा वडिलांनी नाही तर माझा वडिलांनी केली आहे. अशा शब्दात त्यांनी आयोगावर टीका केली आहे.

Uddhav Thackeray
'ढेकन चिरडायला तोफेची गरज नाही' उद्धव ठाकरेंचा घणाघात

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

निवडणुक आयोगाचा निर्णयावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला निवडणुक आयोगाला सांगायचं, तुम्हाला जर मोती बिंदू झाला नसेल तर इकडे येऊन बघा खरी शिवसेना कोणती हे बघायला या. हा चुना लगाव आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहे. निवडणुक आयोग म्हणून राहण्याचा अधिकार नाही. शिवसेनेची स्थापना निवडणुक आयोगाचा वडिलांनी नाही तर माझा वडिलांनी केली आहे. निवडणुक आयुक्तांचे वडील वर बसले असतील पण माझे नाही. अशी देखील टीका त्यांनी निवडणूक आयोगावर केली.

पुढे ते म्हणाले की, आज तर माझ्या हातात काही नाहीये. माझे हात रिकामे आहेत मी तुम्हाला काही देवू शकत नाही तरी तुम्ही माझ्यासोबत आले आहात. आज मी तुमच्याकडे मागायला आलो. मला तुमची साथ हवी आशीर्वाद हवा आहे. जे भुरटे, गद्दार, चोर आहेत तोतया आहेत. मला त्यांना सांगायचे तुम्ही शिवसेना नाव चोरू शकतात पण शिवसेना नाही. धनुष्य बाण चोरू शकताल पण पेलू शकणार नाही. मी मागे बोलो रावण उताणा पडला धनुष्य घेऊन तर हे मिंधे कुठे पेलू शकणार. असा घणाघात त्यांनी यावेळी शिवसेनेवर केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com