Chandrakant Khaire | Imtiyaz Jaleel
Chandrakant Khaire | Imtiyaz Jaleel Team Lokshahi

औरंगजेबाने मुस्लिम समाजाला सुद्धा त्रास दिला; खैरेंची जलील यांच्यावर जोरदार टीका

या नामांतराविरुद्ध आज खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली.
Published by :
Sagar Pradhan

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिली. एकीकडे नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर जल्लोष साजरी होत असताना दुसरीकडे तर दुसरीकडे आता या निर्णयाचा विरोध होताना देखील दिसत आहे. दरम्यान, या नामांतराविरुद्ध आज खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली. मात्र, त्यावेळी या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याच घडनेव आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे.

Chandrakant Khaire | Imtiyaz Jaleel
छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगासोबत झळकले औरंगजेबचे पोस्टर, जलील यांच्या उपोषणातील प्रकार

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

जलील यांच्या साखळी उपोषणात औरंगजेबाचे फोटो झळकावण्यात आले. त्यावर बोलताना खैरे म्हणाले की, याचा मी तिव्र निषेध करत आहे. हे सर्व नाटक आहे. छत्रपती संभाजी महाराजंच्या नावाला विरोध करणे चुकीचे आहे. जलील यांचा जनाधार गेलेला आहे. त्यामुळे ते असे नाटक करत आहेत. मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. त्यामुळे हे षडयंत्र रचण्यात आले आहे. इम्तियाज जलील यांनी त्यांच्या पोराचे नाव औरंगजेब का नाही ठेवले. एआयएमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवावे. औरंगजेबाने मुस्लिम समाजाला सुद्धा त्रास दिला आहे. त्यांनी मंदिरे तोडले, एवढ प्रेम जलील यांना कसे वाटायला लागले. अशी टीका त्यांनी यावेळी जलील यांच्यावर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com