ठाण्यात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून राडा; ठाकरे गट-शिवसेना आमने-सामने

ठाण्यात शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्यावरून राडा; ठाकरे गट-शिवसेना आमने-सामने

मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त; पुन्हा एकदा शाखेचा वाद चिघळला

ठाणे : निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला दिल्याचा निर्णय दिला आहे. यानंतर राज्यभरात शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण आहे. अशातच, शिवसेनेकडून ठाणे शिवसेना शाखेवर ताबा मिळावण्याचा प्रयत्न केला. यावरुन ठाकरे गट आणि शिवसेना आमने-सामने आले असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होते.

शिवसेनेने ठाण्यातील शिवाई नगर या परिसरातील शाखेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यावरुन ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com