भारतातील शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा! "एक्झिट पोल कंपन्यांसह मोदी, शाह यांची चौकशी करा" - राहुल गांधी

भारतातील शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा! "एक्झिट पोल कंपन्यांसह मोदी, शाह यांची चौकशी करा" - राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. शेअर बाजारावर सरकारच्या टिप्पणीमुळे लाखो किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान झाल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे राहुल गांधी म्हणाले. शेअर बाजारातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे त्यांनी सांगितले. त्याची संसदीय समितीमार्फत चौकशी व्हायला हवी. "निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री, अर्थमंत्र्यांनी देशातील लोकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा घोटाळा उघड केला. एक्झिट पोल आल्यावर शेअर मार्केट गगनाला जाऊन भिडेल असं मोदी म्हणाले होते. मोदींनी 4 जून पूर्वी शेअर खरेदी करण्यास सांगितले होते. अमित शाहांनी देखील 4 जून पूर्वी शेअर खरेदी करण्यास सांगितले होते. 1 जून रोजी मीडियाने खोटे एक्झिट पोल आणले. भाजपच्या ऑफिशियल सर्व्हेत त्यांना 220 ते 230 जागा मिळाल्याची माहिती अंतर्गत यंत्रणांनी सरकारला दिली होती. मोदी आणि शाह यांनी खोटी माहिती देऊन शेअर खरेदी करण्यास सांगितले. यावरून काही ना काही घोटाळा होत असल्याचे दिसून येते. येथे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. शेअर बाजार कोसळल्यानंतर 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेअर मार्केटमधील हा सर्वात मोठा तोटा आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

शेअर मार्केट 3 जून रोजी सर्व विक्रम मोडतो आणि 4 जून रोजी कोसळतो. भाजपच्या सर्वात मोठ्या नेत्यांनी किरकोळ गुंतवणूकदारांना संदेश दिला आहे. त्यांना माहित होतं की भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नाही, त्यांना माहित होते की 3-4 जूनला काय होणार आहे. घोटाळा होणार हे त्यांना माहित होतं. हे मोदीजींचे खोटे गुंतवणूकदार आणि जे विदेशी गुंतवणूकदार आहेत. हा स्टॉक मार्केटमधील सर्वात मोठा स्कॅम आहे. निवडणुकीत किती जागा येतील हे माहीत असूनही मोदी आणि शाह यांनी शेअर खरेदी करायला लावले. त्यामुळे या घोटाळ्याबाबत जेपीसी चौकशी झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात गुंतवणूकदारांचे करोडोंचे नुकसान झाले आहे. हा गुन्हेगारी स्वरुपाचा गुन्हा आहे. पंतप्रधान, गृहमंत्री, एक्झिट पोल करणाऱ्यांची आणि परदेशी गुंतवणूकदारांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त अदानी यांच्या चॅनललाच मुलाखती दिल्या. त्या का? या सर्व गोष्टी बाहेर आल्या पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चार प्रश्नही विचारले. पंतप्रधानांनी देशातील जनतेला गुंतवणूक करण्याचा सल्ला का दिला? गृहमंत्र्यांनी त्यांना साठा खरेदी करण्याचे आदेश का दिले? दोघांचीही मुलाखत झाली. हे अदानीजींच्या वाहिनीला देण्यात आले होते. त्या वाहिनीची आधीपासूनच सेबी चौकशी सुरु आहे. हे मोदीजींचे खोटे गुंतवणूकदार आणि जे विदेशी गुंतवणूकदार आहेत. त्यांचा काय संबंध आहेत आणि संबंध असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी असे राहुल गांधी पत्रकार परिदेत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com