Video करमुक्त का? त्यापेक्षा द काश्मीर फाइल्स यूट्यूबर टाका

Video करमुक्त का? त्यापेक्षा द काश्मीर फाइल्स यूट्यूबर टाका

Published by :
Jitendra Zavar

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या स्टार्सनी काम केले आहे. काश्मीर फाइल्स बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. त्यामुळे तिकडे तारांच्या कामाचेही कौतुक होत आहे. भाजपकडून (bjp)हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे. त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal)यांनी जोरदार टीका केली.

दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांनी सांगितले की, "जास्तीत जास्त लोकांनी चित्रपट पाहावा यासाठी भाजपचे लोक काश्मीर फाइल्स करमुक्त करण्याची मागणी करत आहेत. परंतु हे करण्याऐवजी दिग्दर्शकांना चित्रपट थेट यूट्यूबवर टाकायला सांगा तिथं लोकांना एकदम फ्री पाहता येईल. काश्मीर फाइल्स चित्रपट तुम्ही टॅक्स फ्री करण्याची मागणी का करत आहात? तुम्हाला एवढंच जर वाटत असेल दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना सांगा, ते चित्रपट यूट्यूबवर टाकतील. मग सर्व लोकांना फुकट पाहता येईल. करमुक्त करण्याची गरजच काय?", असं केजरीवाल म्हणाले. तसंच काश्मिरी पंडितांच्या नावावर कुणीतरी कोट्यवधींची कमाई करत आहे आणि भाजपावाल्यांना त्यांनी चित्रपटाचे पोस्टर लावण्याचं काम दिलं आहे, असाही टोला केजरीवालांनी लगावला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com