Vidhan Parishad Election: विधानपरिषदेसाठी भाजपकडून 'या' पाच नावांची यादी जाहीर

Vidhan Parishad Election: विधानपरिषदेसाठी भाजपकडून 'या' पाच नावांची यादी जाहीर

भाजपा उमेदवारांची यादी अखेर जाहीर झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या (दि.2) जुलै शेवटची तारीख आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. मात्र, राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. अशातच आता महायुतीमधील भाजपच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

भाजपा उमेदवारांची यादी अखेर जाहीर झाली आहे. पंकजा मुंडे व सदाभाऊ खोत यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली असून योगेश टिळेकर, परिणय फुके व अमित गोरखे यांनाही विधानपरिषदेवर संधी मिळाली आहे. भाजपकडून पाचही विधानपरिषद उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान विधान परिषदेसाठी महाराष्ट्र भाजपने पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे 10 नावे पाठवली होती. त्यातील पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत या पाच जणांच्या नावांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. येत्या 12 जुलै रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com