ठाकरे गटाच्या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; विचारले, तुम्ही कोण?

ठाकरे गटाच्या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; विचारले, तुम्ही कोण?

शिवसेनेच्या पक्षनिधी शिंदे गटाला देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

नवी दिल्ली : ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. शिवसेनेच्या पक्षनिधी शिंदे गटाला देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत याचिकाकर्त्याला फटकारले असून तुम्ही कोण? असा थेट सवाल विचारला आहे. दरम्यान, मुंबईतील वकील आशिष गिरी यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती.

ठाकरे गटाच्या विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; विचारले, तुम्ही कोण?
Barsu refinery खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. तर, सर्वोच्च न्यायालयानेही यावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेते बनले आहेत. यामुळे शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात यावा.

शिवसेना भवन, सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला देण्यात यावा. तसेच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणी याचिकेद्वारे आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. आशिष गिरी यांनी कोणत्याही गटाचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावर मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी तुम्ही कोण? असा सवाल करत याचिका फेटाळून लावली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com