अंधेरीतील 'मॅकडॉनल्ड' शॉपमध्ये चोरी

अंधेरीतील 'मॅकडॉनल्ड' शॉपमध्ये चोरी

मागील काही दिवसापासून पश्चिम उपनगरात चोरीच्या घटना वाढताना दिसून येत आहे
Published by  :
Siddhi Naringrekar

रिध्देश हातिम, मुंबई

मागील काही दिवसापासून पश्चिम उपनगरात चोरीच्या घटना वाढताना दिसून येत आहे. मात्र असा चोरांचे मुसक्या देखील पोलिसांकडून आवळले जातात. तसेच काही आरोपींना काही तासातच अटक केले जाते अशीच काही घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली अंधेरी पूर्व येथील 'मॅकडॉनल्ड' शॉप मधील चोरी झाल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींना अवघ्या दोन तासात पकडले अटक आरोपींचे नाव विजय चंद्रकांत पाले (29), प्रणिकेत रमेश भोसले (26) असून पोलिसांनी रोख रक्कम 5200/- व कॅश काउन्टर मशिन 20,000/- चे मुद्देमाल जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 'मॅकडॉनल्ड' मध्ये मॅनेजर म्हणुन काम करतात, दिनांक 23/7/23 रोजी रात्री 01.00 वाजता शॉप बंद झाले परंतु दरवाजाच्या बाजुची खीडकि दुध घेण्याकरीत म्हणुन शटर न लावत काच लावुन ठेवतात, फिर्यादी व त्यांचे सहकारी लाॅबी क्र.2 मध्ये साफसाफाई करण्याचे काम करीत होते. साधारण 03.10 वाजताच्या सुमारास एका कामगाराने त्याचे कॅश काऊंटर चोरी झाल्याचे पाहीले फिर्यादी यांना कॅमेरे तपासले तेव्हा दोन इसम खिडकि उघडुन आतमध्ये घुसुन चोरी करताना दिसुन आले तसेच त्यांची रोख रक्कम 13,000/- व 20,000/- किमतीचे कॅश काऊंटर चोरी झाले असल्याची खात्री झाली म्हणुन त्यांनी तक्रार दिल्याने वर नमुद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो. उ नि अमित यादव व पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले, त्याचे अवलोकन केले असता त्यात दोन संशयित इसम शॉप मध्ये प्रवेश करून चोरी करताना दिसून आले. गुप्त बातमीदारास सीसीटीव्ही फुटेज दाखवले असता फुटेज मधील आरोपी हे विजय पाले व प्रनिकेत भोसले असून सध्या ते गावदेवी डोंगर येथे येणार असल्याची खात्रीलायक माहीती प्राप्त झाली. मिळालेल्या माहीतीनुसार शहानिशा करून गावदेवी डोंगर अंधेरी पश्चिम येथे सापळा रचून दोन्ही आरोपीतास ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यास आणून नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हेत स्पष्ट सहभागी असल्याचे आढळून आल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com