नागपूर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या दोन गटासाठी असणार दोन कार्यालय

नागपूर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या दोन गटासाठी असणार दोन कार्यालय

नागपुरात हिवाळी अधिवेशन डिसेंबर मध्ये होणार असल्याने राष्ट्रवादी फुटल्यामुळे दोन्ही गटाला कार्यालय द्यावे लागणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

कल्पना नळसकर - असूर, नागपूर

नागपुरात हिवाळी अधिवेशन डिसेंबर मध्ये होणार असल्याने राष्ट्रवादी फुटल्यामुळे दोन्ही गटाला कार्यालय द्यावे लागणार आहे. मागील हिवाळी अधिवेशनात शिवसेना पक्ष फुटी नंतर कोणतं कार्यालय कोणाला मिळतं या चर्चा रंगल्या होत्या. ती चर्चा यंदा पुन्हा रंगणार आहे मात्र ती असणार आहे राष्ट्रवादी पक्षाचा दोन गटांसाठी.

शरद पवार गट आणि अजित पवार या दोन्ही गटांना नागपूरच्या विधान भवन परिसरात हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाजासाठी पक्षीय कार्यालय द्याव लागणार आहे. राष्ट्रवादीचं एक कार्यालय असणारच आहे. शिवाय नव्याने आता दुसऱ्या गटासाठी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चाचपणी करून तयार केला जाणार आहे. यामध्ये जुनं कार्यालय मात्र शरद पवार गटाला मिळतं की अजितदादा पवार गटाला हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. पक्ष कार्यालयाची फलक लागल्यावरच स्पष्ट होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com