MNS
MNS Team Lokshahi

तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा अनुभवण्यासाठी..., गुढीपाडवा मेळाव्याचा मनसेकडून तिसरा टीझर जारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात २२ मार्चला शिवाजी पार्क येथे गुढीपाडवा मेळावा होणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसेने आपल्या तयारीचा वेग वाढवला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मनसे मेहनत घेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात २२ मार्चला शिवाजी पार्क येथे गुढीपाडवा मेळावा होणार आहे. याआधीच मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेलयांनी पाडवा मेळाव्यात सगळ बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच मेळाव्याचा आता मनसे नवा टीझर जारी केला आहे.

MNS
'बाप-बेटे अफजल खानाप्रमाणे चालून आले होते'

काय आहे या नव्या टीझरमध्ये?

मनसे आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर हा टीझर शेअर केला आहे. मनसेने आतापर्यंत तीन टीझर शेअर केले आहे. त्यामध्ये वर लिहले की, तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा अनुभवण्यासाठी... चला शिवतीर्थावर ! असे लिहले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com