लोकसभेतून आणखी दोन खासदारांचे निलंबन,  संख्या 143 वर

लोकसभेतून आणखी दोन खासदारांचे निलंबन, संख्या 143 वर

संसदेत विरोधी खासदारांच्या निलंबनाचे सत्र आजही सुरूच आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी आणखी दोन खासदारांना निलंबित केले आहे.

नवी दिल्ली : संसदेत विरोधी खासदारांच्या निलंबनाचे सत्र आजही सुरूच आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी आणखी दोन खासदारांना निलंबित केले आहे. आतापर्यंत हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या १४३ वर पोहोचली आहे.

लोकसभेतून आणखी दोन खासदारांचे निलंबन,  संख्या 143 वर
Girish Mahajan Vs Yashomati Thakur : अंगणवाडी सेविकांच्या मानधनावरुन आजी-माजी मंत्र्यांमध्ये जुंपली

लोकसभेत फलक दाखवून सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी आणखी दोन विरोधी सदस्यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण 97 लोकसभा सदस्यांना निलंबित करण्यात आले होते. याआधी गेल्या आठवड्यात गुरुवारी १३, सोमवारी ३३ आणि मंगळवारी ४९ सदस्यांना निलंबित करण्यात आले होते.

फौजदारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयकांवरील चर्चेदरम्यान, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सी. थॉमस आणि एएम आरिफ या दोन विरोधी सदस्यांची नावे दिली आणि अध्यक्षांच्या अवमानाबद्दल त्यांना संसदेच्या अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. जे सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केले. आरिफ हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) खासदार आहेत आणि सी. थॉमस हे केरळ काँग्रेसचे आहेत.

विरोधकांची मागणी काय?

विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांना संसदेच्या सुरक्षेबाबत सभागृहात निवेदन देण्याची मागणी केली आहे. सरकारचे म्हणणे आहे की ही चूक लोकसभा सचिवालयाच्या अखत्यारीत येते आणि त्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या मुद्द्यावर राजकारण होता कामा नये.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com