मी उद्या रत्नागिरी कार्यालयात जाणार, आंदोलक भेटले तर... : उदय सामंत

मी उद्या रत्नागिरी कार्यालयात जाणार, आंदोलक भेटले तर... : उदय सामंत

कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन चिघळले असून पोलिसांनी आज आंदोलकांवर लाठीचार्ज केला असून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

मुंबई : कोकणातील रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन चिघळले असून पोलिसांनी आज आंदोलकांवर लाठीचार्ज केला असून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यावरुन आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, रिफायनरी विरोधात बारसूमध्ये सुरु असलेले आंदोलन आता तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अखेर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

मी उद्या रत्नागिरी कार्यालयात जाणार, आंदोलक भेटले तर... : उदय सामंत
पंकजा मुंडेंना मोठा धक्का! बाजार समितीत भाजपचा सुपडा साफ; राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

पाच वाजता जिल्हाधिकारी व एसपी चर्चा करायला गेले होते. पण, लोकांनी चर्चा केली नाही. 3 दिवस चर्चा करायला सरकार तयार आहे. कुणाबरोबर चर्चा करायची ती यादी लोकांनी द्यावी. आडमुठे धोरण सरकारचे नाही, असे आवाहन उदय सामंत यांनी केले आहे. मी उद्या रत्नागिरी कार्यालयात जाणार आहे. लोक भेटले तर माझी भेटायची तयारी आहे. समन्वय साधला गेला पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे. तर, प्रकल्पाच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरणार आहेत. मी म्हटलं कटुता निर्माण होता कामा नये. तेथील स्थानिक व्यापारी, उद्योजक यांनी समर्थन दिले आहे, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

अजित पवार यांनी आमचा विकासला विरोध नाही. परंतु, पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये, असे म्हंटले होते. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये हीच आमची भूमिका आहे. चर्चेतून प्रश्न सुटू शकतात. पण, काही लोक दुटप्पी भूमिका घेत आहेत, असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, विनायक राऊत रिफायनरीला विरोध करत आहेत. तर, राजन साळवी समर्थन करत असल्याचे दिसून आले आहे. यावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे गणित अनेकांचा गणित बिघडवत असतील तर ते कुणाला कळणार नाही. एक लोक प्रतिनिधी प्रकल्प नको म्हणून आक्रमक होतात. दुसरे लोकांच्या विकासासाठी योग्य असल्याचे सांगतात. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com