उदय सामंत यांनी मांडला इंडिया आघाडीच्या बैठकीचा खर्च
आज देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईतील ग्रँड हयातमध्ये दाखल होतील.आज आणि उद्या देशभरातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. इंडिया आघाडीची बैठक विमानतळाजवळील 'ग्रॅण्ड हयात' या पंचतारांकित हॉटेलामध्ये होणार आहे.ग्रॅण्ड हयात हॉटेलबाहेर मराठमोळ्या पद्धतीने सर्व नेते मंडळींचे स्वागत केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमधून त्यांनी या इंडिया आघाडी बैठकीवर टीका केली आहे. तसेच इंडिया आघाडीच्या बैठकीचा खर्च त्यांनी सांगितला आहे.
उदय सामंत म्हणाले की, ही त्यांची बैठक 14 ते 15 तासांची आहे. आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो तेव्हा हे पंचतारांकित हॉटेलबद्दल बोलत होते. या बैठकीसाठी 45 हजार रुपयांच्या 65 खुर्च्या मागवण्यात आल्या आहेत. मराठमोळ्या जेवणाची किंमत साडेचार हजार रुपये आहे. खोलीची किंमत 25 ते 30 हजार आहे. 14 तासांसाठी करोड रुपयांचा खर्च करण्यात आला. या निवडणुकीनंतर हे सर्व बेरोजगार होणार आहेत. मुंबईत असुंतुष्टांचा मेळावा भरतोय. लोकसभा संपली की इंडिया आघाडी पूर्णपणे बंद होईल.