दावोस दौऱ्याचा सगळा खर्च जनतेसमोर मांडणार; उदय सामंतांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

दावोस दौऱ्याचा सगळा खर्च जनतेसमोर मांडणार; उदय सामंतांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

परदेश दौऱ्यावरुन आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. याला आता उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.

पुणे : मुख्यमंत्री आणि मंत्री जनतेच्या पैशावर परदेश दौरे करत आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या टीकेला आता उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. मी स्वतः दावोसला जाऊन आढावा घेणार आहे. ज्यांनी टीका केली आहे की मी कुणाला भेटणार आहे त्यांनी माझ्यासोबत यावं आणि पाहावं, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. दावोस दौऱ्याचा सगळा खर्च जनतेसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

दावोस दौऱ्याचा सगळा खर्च जनतेसमोर मांडणार; उदय सामंतांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
अजित पवार नेहमीच खरं आणि योग्य बोलतात; का म्हणाले जयंत पाटील असं?

उदय सामंत म्हणाले की, आज सकाळी आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्यात दावोसमध्ये झालेल्या करार आणि गुंतवणुकीबद्दल विचारण्यात आलं. दावोस ३२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. ४ दिवसांची परिषद होती. राज्याच्या पॅव्हेलियनसाठी जास्त भाडे लागलं. आपल ४ हजार स्क्वेअरफिट पॅव्हेलियन होते. त्याचा खर्च १६ कोटी रूपये आला. २०२३ च शिष्टमंडळ देखील चौपट होतं. खर्च कुणाच्या सांगण्यावरून, ट्विट वरुन झाला नाही तर तो कामाचा झाला. तो खर्च कमीत कमी करण्याचा आमचा प्रयत्न होता.

दावोसमध्ये झालेले करार २०२१ मध्ये १ कोटी ३७ लाख, २०२२ मध्ये ८० हजार कोटी आणि त्यात केवळ १२ हजार कोटींची अंमलबजावणी झाली. २०२३ मध्ये १ लाख ३७ कोटी रूपयांच्या वर करार झाले आहेत. त्यातील ७० टक्के काम पूर्ण झाली आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.

काही लोकांना सकाळी उठलं की एकनाथ शिंदे दिसतात आणि त्यांच्यावर टीका केली जाते. ते पत्रकार परिषदेत वाढवून सांगतात आणि जनतेची दिशाभूल करतात. पुरावे आमच्याकडे देखिल आहेत हे माहितीच्या अधिकारात मागवा अणि कळवा, असा टोलादेखील त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

सध्या आपलं राज्य परदेशी गुंतवणुकीत एक नंबरवर आहे. अनेक कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली आहे. हे मुख्यमंत्री यांच्या प्रयत्नामुळे यशस्वी झालं. दौरा कुणाच्या ट्विटमुळे नाही तर नागपुरात जी ढगफुटी झाली, राज्यांत आंदोलनं सुरू आहेत म्हणून एकनाथ शिंदे यांनी दौरा रद्द केला, असेही उत्तर सामंतांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.

मी लंडनला जात आहे. मी स्वतः दावोसला जाऊन आढावा घेणार आहे. ज्यांनी टिका केली आहे की मी कुणाला भेटणार आहे त्यांनी माझ्यासोबत यावं आणि पाहावं. दावोस दौऱ्याचा सगळा खर्च जनतेसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. एवढ्या खालच्या पातळीवर टीकेवर राजकारण करू नका. नुसत्या पत्रकार परिषद घेऊन टीका करुन होत नाही. दौऱ्याला अजून एकही रुपये खर्च झाला नाही. माझ्या दौऱ्यावर त्यांनी अहवाल घ्यावा आणि कुणाच्या पैशाने गेलो किती खर्च झाला हे आधी पाहावं, असे आव्हानही उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com