"काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका..."; गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा

"काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका..."; गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी काल (2 ऑगस्ट) रात्री कात्रज चौकात हल्ला केला. या दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी आले होते.
Published by :
Team Lokshahi

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या कारवर शिवसैनिकांनी काल (2 ऑगस्ट) रात्री कात्रज चौकात हल्ला केला. या दगडफेकीत सामंत यांच्या कारची काच फुटली. कात्रज भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) एका कार्यक्रमासाठी आले होते. कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा मंगळवारी रात्री पार पाडली. शिंदे यांच्यासह सामंत आले होते त्यावेळीच हा हल्ला झाला. मात्र आता या हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर सामंत यांनी ट्विटरवरून थेट शिवसेनेला इशारा दिलाय.

"काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका..."; गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा
Shivsena vs Shivsena LIVE : उध्दव ठाकरे हेच पक्षप्रमुख, शिंदे गटालाही मान्य : सिब्बल

सामंत यांनी ट्विटरवरुन “गद्दार म्हणता तरी शांत आहे. शिव्या घालता तरी शांत आहे. आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही. काळ ह्याला उत्तर आहे. अंत पाहू नका,” असं ट्विट केलं आहे.

"काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका..."; गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा
शेतकऱ्याचा नादच खुळा; साहेब इंग्रजीत सांगू की मराठीत, अशी दिली अतिवृष्टी नुकसानीची माहिती

शिवसेनेच्या नेत्यांची वेगवेगळी भूमिका

असा हल्ला करणारा माझा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता असता तर मी कारवाई करायला सांगितली असती असंही सामंत यांनी या हल्ल्यासंदर्भात सांगितलं. तसेच निलम गोऱ्हे, सुभाष देसाई यासारख्या नेत्यांनी या हल्ल्यावर दिलेल्या प्रतिक्रियांचा संदर्भ देत सामंत यांनी शिवसेनेच्या नेत्यांची या हल्ल्यासंदर्भात वेगवेगळी भूमिका आहे याबद्दल मला काही बोलायचं नाही, असं म्हटलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com