Satara
SataraTeam Lokshahi

साताऱ्यातील त्या राड्यावर काय म्हणाले उदयनराजे आणि शिवेंद्रराजे?

'ती जागा माझ्या मालकीची आहे. तिथे हे सगळे अल्पभूधारक लोक कोण आहेत?
Published by :
Sagar Pradhan

आज साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचं समर्थक भिडल्याची घटना समोर आली. त्यामुळे आता साताऱ्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. खिंदवाडी भागात या दोन्ही नेत्यांचं समर्थक भिडले. साताऱ्यात शिवराज पेट्रोल पंपानजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच भूमिपूजन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार होतं. परंतु, खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला. यावरच आता शिवेंद्रराजे यांनी प्रतिक्रिया दिली.

Satara
...तर शिंदेंनी डोक्यात गोळी घालून घेतली असती; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

नेमकं काय म्हणाले शिवेंद्रराजे भोसले?

खिंदवाडी भागात झालेल्या राड्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले की, 'कृषी उत्पन्न बाजार समितीला उपबाजार उभा करण्यासाठी शासनाकडून ही जमीन अधिग्रहीत करून देण्यात आली आहे. या जमिनीसाठी लागणारी रक्कम बाजार समितीने भरली आहे. सर्व कायदेशीर गोष्टी केल्या आहेत. जमिनीचा सातबारा कमिटीच्या नावावर आहे. गेलं वर्षभर प्रशासक असल्यामुळे आम्हाला मार्केटचं काम सुरू करता आले नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आम्ही घोषणा केली होती की सुसज्ज मार्केट इथे उभारण्यात येईल. त्यानुसार आम्ही काम सुरू केले होते.' असे ते म्हणाले.

राड्यावर काय म्हणाले उदयराजे?

राड्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, 'ती जागा माझ्या मालकीची आहे. तिथे हे सगळे अल्पभूधारक लोक कोण आहेत? ते जवळपास सात-आठ वर्षं आर्मीमध्ये होते. आज तुम्ही तिथे येऊन दगड ठेवणार, नारळ फोडणार, फटाके फोडणार? या प्रकरणात न्यायालयाचे स्थगिती आदेश आहेत. पण पोलीस त्यांना मदत करत आहेत. त्यामुळे यावरचा सविस्तर ड्राफ्ट तयार करू. उद्या उपमुख्यमंत्री इथे येणार आहेत. त्यांच्यासमोर ही मांडणी करणार आहोत.' असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com