महाराष्ट्राचा पुढचा कारभार फडणवीसांना हातात घ्यावा लागणार; उदयनराजेंचे सूचक वक्तव्य

महाराष्ट्राचा पुढचा कारभार फडणवीसांना हातात घ्यावा लागणार; उदयनराजेंचे सूचक वक्तव्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कराडमध्ये आल्यानंतर बैलगाडीतून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी उदयनराजे भोसले यांनी सूचक विधान केले आहे.

सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कराडमध्ये आल्यानंतर बैलगाडीतून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी फडणवीसांनी बैलांचा कासरा हातात घेत बैलगाडी चालवली. आता देवेंद्र फडणवीसांना राज्याचा कासरा (कारभार) हातात घ्यावा लागणार आहे, अशी राजकीय टोलेबाजी करत असताना पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार असल्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सूचक विधान केले आहे. कराड येथे कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी उदयनराजे भोसले बोलत होते.

महाराष्ट्राचा पुढचा कारभार फडणवीसांना हातात घ्यावा लागणार; उदयनराजेंचे सूचक वक्तव्य
प्रणिती आणि सुशीलकुमार शिंदेंना भाजपची ऑफर? बावनकुळे म्हणाले...

उदयनराजे भोसले म्हणाले की, मोदींनी सिंचनासाठी जे निर्णय घेतले ते वाखण्याजोगे आहेत. शेतकरी सधन झाला तरच पूरक व्यवसाय मोठे होतील. त्यासाठी शेतकरी स्वयंपूर्ण होईल.

काँग्रेसच्या इंदिरा गांधी, चंद्रशेखर राव, प्रतिभाताई पाटील असे अनेक नेते महान आणि बुद्धीमान होते. परंतु, वंचित आणि गोरगरीब यांच्यासाठी त्यांनी घोषणा केल्या. मात्र, सर्व प्रत्यक्षात आणण्याचे काम मोदींनी केले, असेही त्यांनी म्हंटले आहे.

डॉ.अतुल भोसले यांनी कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमसाठी निधी देऊन रणजी सामने खेळवले जावेत. या रणजी मॅचमध्ये टीमचे कॅप्टन म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी यावे. मात्र, या टीममध्ये मला घ्यावे. मला आता रिझर्व्ह मध्ये ठेवू नका, असे मंत्री पदावरून सूचक वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले.

राज्यात भाजप, शिंदे आणि अजित पवार गट एकत्र लोकसभा निवडणूक लढल्यास विरोधात कोणताही उमेदवार असला तरी महायुतीचे 45 नव्हे तर 48 खासदार निवडून येणार आहेत. कोणीही आता महायुतीला रोखू शकत नाही, असा विश्वासउदयनराजे यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com