uddhav thackeray | eknath shindes
uddhav thackeray | eknath shindes team lokshahi

एकनाथ शिंदेंची सूचक फेसबुक पोस्ट, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद धोक्यात?

नॉट रिचेबल आमदारांची नावं आली समोर
Published by :
Shubham Tate

Uddhav Thackeray Eknath Shinde : विधानपरिषद (vidhan parishad) निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीत कॉंग्रेसच्या एका उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला. निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) उमेदवारांनाही काठावर मतं मिळाली. म्हणजेच शिवसेना आणि कॉंग्रेसची (Congress) मतं फुटल्याचे स्पष्ट झालं आहे. आज शिवसेनेच्या पहिल्या फळीतील मोठे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक शिवसेना आमदार नॉटरिचेबल असून ते सूरतमध्ये असल्याची माहिती आहे. (uddhav thackeray already know about eknath shinde displeasure political)

शिंदे यांच्यासोबत कोकण, ठाणे आणि औरंगाबादमधील सहा आमदार नॉट रिचेबल आहेत. दोन विद्यमान मंत्र्यांसोबत शिंदे हे सुरतला आले असून आज दुपारी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आज ठाकरे सरकार संकटात सापडल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपमध्ये (bjp) प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

uddhav thackeray | eknath shindes
एकनाथ शिंदेंची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद, करणार भूमिका स्पष्ट

नॉट रिचेबल आमदार

संजय रायमुलकर बुलढाणा

संजय गायकवाड बुलढाणा

महेश शिंदे

शाहजी पाटील

भरत गोगावले

प्रताप सरनाईक, ठाणे

विश्वनाथ भोराई , कल्याण '

महिंद्र थोरवे, रायगड

बबनराव थोरवे, कर्जत

चंद्रकांत पाटील , जळगाव

बालाजी किणीकर, कल्याण

दरम्यान, एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार काठावर पास झाले आहेत. शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण 12 मतं फुटल्याचं कालच्या विधान परिषद निवडणुकी स्पष्ट झालं आहे.

याच पाश्र्वभूमीवर रात्री शिवसेनेने वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावली होती. ही बैठक रात्री दोन वाजेपर्यंत चालली असल्याचे बोलले जात आहे. तसेच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्व आमदारांची वर्षावर तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेनेच्या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील मतभेदाची उघडपणे चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दुसरीकडे आमदारांमध्येही नेतृत्त्वाबाबत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. शिवसेनेकडून वारंवार ही चर्चा फेटाळून लावण्यात येत असतानाच आता मात्र मोठी घडामोड घडताना पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com