उद्धव ठाकरे लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाकरी फिरवणार; सुत्रांनी दिली महत्वाची माहिती

उद्धव ठाकरे लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाकरी फिरवणार; सुत्रांनी दिली महत्वाची माहिती

लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने आक्रमक भूमिका; मतदारसंघात उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश

मुंबई : कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर महाविकास आघाडीचे बैठकींचे सत्र सुरु झाले आहे. अशातच, ठाकरे गटाकडून मोठी माहिती समोर आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाकरी फिरवणार असल्याचे माहिती सुत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. यादरम्यान २०२४ च्या निवडणुकीसाठी मुंबईतील लोकसभा मतदार संघातील उमेदवार ठाकरे गटाने बदलले असल्याचे समजते आहे.

उद्धव ठाकरे लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाकरी फिरवणार; सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
...अन्यथा नाईलाजाने मला राजीनामा द्यावा लागेल; निधीवरुन भाजप आमदाराचा फडणवीसांना इशारा

सुत्रांच्या माहितीनुसार, दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याऐवजी खासदार अनिल देसाई यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. तर, अरविंद सावंत यांना उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरोधात उमेदवारी देणार आहेत. शिवसेना ठाकरे गट दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर किंवा माजी महापौर विशाखा राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

ईशान्य मुंबई मतदार संघातून माजी खासदार संजय दिना पाटील किंवा महाविकास आघाडीत जागावाटपात अदलाबदल झाल्यास दक्षिण मुंबई मतदार संघाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्या संदर्भात अंतिम चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गट मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून माजी महापौर आणि विद्यमान प्रतोद सुनिल प्रभू यांना उमेदवारी देण्याची तयारी करत आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत मतदारसंघात उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिले. लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असला तरी आतापासूनच ठाकरे गटाच्या उमेदवारांना मतदारसंघात तयारीला लागा, असे आदेश देण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com