'केंद्राने हे पार्सल महाराष्ट्रातून घेऊन जावं अन् दुसऱ्या वृद्धाश्रमात टाकावं'

'केंद्राने हे पार्सल महाराष्ट्रातून घेऊन जावं अन् दुसऱ्या वृद्धाश्रमात टाकावं'

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत घणाघात केला आहे.

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे राज्यात राज्यात मोठा वाद उभा राहिला आहे. यावर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत घणाघात केला आहे. तसेच, मोदी सरकारवरही जोरदार टीका केली आहे. आपल्या राज्यपालांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले आहे.

उध्दव ठाकरे म्हणाले की, केंद्रात ज्यांचे सरकार असेल त्याच पक्षाची माणसे राज्यपाल म्हणून देशातील राज्यांमध्ये पाठवली जातात. या माणसांची कुवत व पात्रता काय असते. ज्यांना वृध्दाश्रमातही जागा नाही अशांना राज्यपाल म्हणून पाठविले जाते का हासुध्दा एक प्रश्न केंद्र सरकारला विचारायला पाहिजे. आणि राज्यपाल नियुक्तीचे निकष ठरवायला पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे.

राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपती नि:पक्ष असायला हवेत, तसेच राज्यपालही असायला हवेत.मात्र, राज्यपाल जे काही बोलतात, ते गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आपल्या राज्यपालांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे. मी राज्यपाल पदाचा आदर करतो, परंतु कोश्यारींचा नाही, अशा शब्दांत त्यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडले आहे.

राज्यपाल पदाचा मी मान करत आलो आहे, यापुढेही करेन. पण राज्यपालपदाची झूल कुणी पांघरली, म्हणजे त्यांनी वेडंवाकडं काहीही बोलावं हे मी आणि महाराष्ट्र मान्य करेल असं मला वाटत नाही. ही शक्कल राज्यापालांच्या काळ्या टोपीतून आलेली नाही. या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे, हे शोधण्याची वेळ आलेली आहे. कारण हळूवारपणे महाराष्ट्राचा अपमान करायचा आणि महाराष्ट्रात आदर्श पुसुन टाकून त्यांचे नेत्यांचा आदर्श म्हणून प्रतिमा जनतेच्या मनात बिंबवण्याची आणि ठसवण्याची ही चाल आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

केंद्राने हे चाळे आता बंद करावे. आपण जे सॅम्पल पाठवलंय ते त्यांच्या घरी परत पाठवा. वृध्दाश्रम असेल तर तिकडे पाठवा. पण, आमच्याकडे हे सॅम्पल नको. याला परत घेऊन जा. जेव्हा काही करु तेव्हा लक्षात येईल. या महाराष्ट्राद्रोह्यांचा विरोध तमाम महाराष्ट्राप्रेमींनी एकत्र येऊन केला पाहिजे. आताच वेळ आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्रद्रोह्यांना दाखवला पाहिजे. मग त्याला महाराष्ट्र बंद करायचाय किंवा मोर्चा काढायचा, असे आवाहन त्यांनी सर्वपक्षीयांना केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com