राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याशी सहमत नाही; उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याशी सहमत नाही; उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकारांवर टीका केल्याने राजकारण तापले आहे. वर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकारांवर टीका केल्याने राजकारण तापले आहे. यावरुन भाजप-शिंदे गटाकडून राहुल गांधींसोबत शिवसेनेवर टीका केली जात आहे. यावर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याशी सहमत नाही; उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
भाजपनेही फडणवीसांचा बदला घेतला; उध्दव ठाकरेंचा टोला

उध्दव ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्य वीर सावरकरांबद्दल आम्हाला प्रेम आहे. पण, त्यांच्या बदद्ल प्रश्न कोणी विचारावा हे हास्यास्पद आहे. आरएसएसदेखील तेव्हा होती. पण, लढ्यापासून लांब होते. स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. केंद्र सरकारचा काही अधिकार असतात. आमच्या पाठीमागे ते दोनदा निवडून आले आहेत. तरीही आठ वर्ष स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न का दिला नाही, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे. तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारण्याचा हक्क नाही. जे राहुल गांधी बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही, अशीही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्या देशाची वाटचाल पुन्हा एकदा गुलामगिरीकडे वळत आहे. स्वातंत्र्य वाचवण्यासाठी जे जे एकत्र आहेत ते एकत्र येतील, असेही उध्दव ठाकरेंनी म्हंटले आहेत.

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याशी सहमत नाही; उध्दव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका
सावरकरांना भारतरत्न खिताब का दिला नाही? ढोंगी प्रेम दाखवू नका :संजय राऊत

काय म्हणाले होते राहुल गांधी?

एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी सावरकरांनी अनेकवेळा इंग्रज सरकारला माफीची पत्रे लिहिली, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. वाशिमच्या मालेगावात क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com