गुजरात निकाल अपेक्षित, महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योग...; उध्दव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

गुजरात निकाल अपेक्षित, महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योग...; उध्दव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया

गुजरात निवडणुकीत विजयाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचे कल हातात येत आहेत. भाजपची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल सुरु असून 150 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. गुजरात निवडणुकीत विजयाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात विजयाबद्दल मी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान मोदी यांचे खास अभिनंदन करतो. गुजरातचा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे अभिनंदन केले.

गुजरात निकाल अपेक्षित, महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योग...; उध्दव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया
भाजपाच्या विजयाला विक्रमाची नवी झालर : एकनाथ शिंदे

उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजरातबरोबरच हिमाचल प्रदेश विधान सभेचे निकाल लागले व तेथे काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. तर दिल्ली 'मनपा' निवडणुकीत 'आप'ने भाजपवर मात केली. याबद्दलही काँग्रेस व आपचे अभिनंदन व शुभेच्छा आहेत.

गुजरातचा निकाल अपेक्षितच होता. गुजरात निवडणूक ही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यामुळेच जनतेने भाजपला भरघोस मतदान केले. त्या विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत असे दिसते, असा टोला उध्दव ठाकरेंनी भाजपला लगावला आहे.

गुजरात निकाल अपेक्षित, महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योग...; उध्दव ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया
सगळी देशाची सत्ता त्यासाठीच वापरण्यात आली; शरद पवारांची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी हे ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते येथेही भरघोस घोषणा करतील ही अपेक्षा. आपने गुजरातेत मोठ्या प्रमाणात मतविभागणी करून भाजपचा फायदा घडवून आणला हे स्पष्टही झाले. असो, ज्याचे त्याचे राजकारण सोयीनुसार चालत असते, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. राज्यातील 182 जागांपैकी भाजप 156 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ 17 जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पार्टी 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर इतरांना चार जागा मिळल्या आहेत. यानुसार भाजप सलग सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com